मुधोळ
मुधोळ : कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण व भूतपूर्व मुधोळ संस्थानाची राजधानी, लोकसंख्या २१,३५६ (१९८१). हे जमखंडीपासून दक्षिणेस १९ किमी.वर घटप्रभा नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. जुन्या काळी ‘मुदुवोलाल’ (सुंदर शहर) या नावाने ते ओळखले जाई.